या संदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण.झाल्याच्या माहितीला सार्वजनिक बांधकाम विभागा कडून दुजोरा
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन नवीन इमारत बांधकामासाठीची प्रशासकीय मान्यता नोव्हेंबर 2022 मध्ये देण्यात आली होती.
108 कोटी च्या नविन ईमारती मध्ये 25 भव्य व अद्यावत कोर्ट हॉल सह अनेक सुविधा असणार आहेत. सध्या नविन इमारतीच्या बाधकामाची टेंडर प्रक्रिया व ईतर प्रशासकीय मान्यता पुर्ण झालेल्या आहेत. यासाठी चा निधी विधी व न्याय विभागाकडे शासनाने वर्ग देखील केला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यात कसलीही अडकाटी राहिली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांनी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ॲड .अविनाश काळे ॲड . प्रकाश अभंगे ऍडव्होकेट युवराज अवताडे, आदींनी कार्यकारी अभियंता गावडे यांची भेट घेवून चर्चा केली व पत्र ही दिले.
कार्यकारी अभियंता गावडे यांनी प्रशासकीय पातळीवरची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन यासाठी च्या अनुषंगिक मान्यता देखील मिळाल्या आहेत, यामुळे पायाभरणी समारंभ करण्यास आता कसलाही अडथळा राहिलेला नाही, लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा राहणार आहे असेही त्यांनी सांगितले, त्यामुळे आत्ता पायाभरणीचा शुभारंभ करण्याची तारिख मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात निश्चित होण्याची शक्यता वाढली आहे.
याविषयी सोलापूर चे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश. एम एस आझमी साहेब यांच्याशी देखील वकील संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे सदस्य ॲड मिलिंद थोबडे यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली आहे.त्यानुसार नियोजन केले जात आहे.