अनगर प्रतिनिधी
अनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातुन मंजूर झालेल्या आष्टी उपसा सिंचन योजनेतुन मोहोळ तालुक्यातील अनगर,हिवरे,देवडी, खंडोबाचीवाडी, वाफळे,गलंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, वडाचीवाडी व चिखली या गावांना शेतीच्या पाण्यासाठी वाढीव क्षेत्राच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आमदार यशवंत(तात्या)माने यांच्या शुभहस्ते व मा.आ.राजनजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील,सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे ,कार्यकारी अभियंता नारायण जोशी ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ योगेश डोके ,प्रविण पाटील ,प्रकाश चवरे, सज्जन पाटील,दिपक माळी,भारत सुतकर, माऊली चव्हाण,शाहीर सलगर,दादासाहेब पाटोळे,शरद पाटील, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब भोसले,दादा बोडके,शहाजी गुंड,शौकत तलफदार, मुस्ताक शेख,आनंद गावडे,प्रमोद डोके,बंडु डिकरे,कुंदन धोत्रे,संतोष मते,हेमंत गरड,भाऊराव इंगळे,नरहरी गुंड, प्रकाश कोकरे,किसन गुंड,मोरे सरपंच सह शेतकरी वर्ग उपस्थित होते.