जयराम घाडगे माळशिरस तालुका प्रतिनिधी
वेळापुर येथील बापूराव हरी चौगुले यांचे चिरंजीव रोहन बापूराव चौगुले याची डी-अमीको शिप इश्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या इंटरनॅशनल कंपनीमध्ये ट्रेनी मरीन इंजिनिअर (अभियंता)या पदावर नियुक्ती झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या घरी जाऊन वेळापूर विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख व वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांच्यावतिने रोहन चौगुले यांचा सन्मान केला.
यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे, पोलीस हवालदार मच्छिंद्र राजगे व राजेंद्र खंडागळे तसेच डॉ. शिवाजी चौगुले व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीची झुंज देत या पदापर्यंत पोहोचलेल्या रोहन याचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.