मोहोळ प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील व उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी या गावात शिरापूर उपसा सिंचन बाबत शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा घेण्यात आला, या शेतकरी मेळाव्यासाठी नरोटेवाडी या गावात शिवसेना पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या हलगीच्या कडकडाटसह जल्लोशात व फटाक्यांची आतषबाजी करत नेत्यांचे स्वागत केले,यानंतर स्थानिक ग्रामदैवत असलेल्या श्री बाळूमामा व विठ्ठल रुक्मिणी मंदिराची आरती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
या शेतकरी मेळाव्यामध्ये शिरापूर उपसा सिंचन विषयी नरोटेवाडीसह इतर सहा ते सात गावाला जाणारा उपसा सिंचन कालव्याचे काम अर्धवट राहिल्याने ते काम पूर्णत्वाकडे होण्यासाठी हा मेळावा आयोजित केला गेला, यासाठी मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी तेथील माहिती घेत राहिलेले अर्धवट काम कसे पूर्ण होईल ह्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकारी व मंत्री यांना याची माहिती देत काम पूर्ण करण्यासाठी लागेल ती मदत करण्याची घोषणा केली, तसेच नरोटेवाडी गावात शिवसेना व युवासेना शाखेचे देखील उद्घाटन करण्यात आले.
या मेळावा व उद्घाटनाप्रसंगी मोहोळ तालुक्याचे संभाव्य उमेदवार राजू खरे, सोलापूर शहर शिवसेनाप्रमुख व महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज भाईजी शेजवाल, सोलापूर जिल्ह्याचे युवासेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक उमेश गायकवाड, युवासेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे, जिल्हा सचिव जावेद भाई पटेल, सोलापूर जिल्हा उपप्रमुख बजरंगजी देवकर, शिवसेना तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे, युवासेना तालुकाप्रमुख आकाश गजघाटे, उपतालुकाप्रमुख अनिकेत लोंढे, शिवसेना गटप्रमुख व सेवालाल नगरचे सरपंच लक्ष्मण राठोड, उपतालुकाप्रमुख नंदकुमार गवळी, बीबीदारफळ गावचे माजी सरपंच शिवाजी ननवरे, नरोटेवाडी गावचे नूतन शाखाप्रमुख जीवन देवकर, उपशाखाप्रमुख विजय कसबे, युवासेना शाखाप्रमुख अमर तोडकर, उपप्रमुख विशाल जाधव, रंगनाथ गुरव, दारफळ गावचे ग्रामपंचायत सदस्य विजय साठे, समाधान चवरे, मार्डी शाखाप्रमुख मनोरंजन जाधव, शफिल कुडले, अरुण जाधव, सिद्धेश्वर कोपा, रणजीत गजघाटे, लक्ष्मण गरड, सचिन वाघमारे,किरण चव्हाण, विकास सावंत, सोहेल शेख, संजय लंबे, केशव गोरे, विलास वाघमारे, यासह आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते. तर स्थानिक पदाधिकारीकडून मान्यवरांचा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी राजू खरे यांनी आपल्या भाषणात मोहोळ मतदार संघामध्ये केलेल्या कामाची माहिती देत व आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधीं कसे कसे काम केले व कुणाचे सालगडी राहिले हे बोलून घेतला खरपूस समाचार.