पंढरपूर प्रतिनिधी
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी बार्डी गावच्या ग्रामपंचायत सदस्या सुधामती माळी आणि उपस्थित सर्व महिलांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
तसेच सावित्रीबाईंनी अतिशय खडतर प्रयत्नातून मुलींसाठी शाळा सुरू करून ज्ञानाची दरवाजे खुली करून दिली.तसेच जोतिबा फुले यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे न डगमगता ज्ञान दानाचे कार्य अखंड सुरू ठेवले. त्यामुळे आज महिला समाजात अभिमानान विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. याविषयी माहिती शाळेचे सहशिक्षक श्री ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे महत्त्व पटवून दिले.तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी भाषण रत आदरांजली वाहिली.या जयंती निमित्ताने महिलांच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण करत जयंती साजरी केली.
यावेळी सुधामती माळी, उषा वसेकर, रेश्मा वसेकर, स्वाती वसेकर, वर्षा वसेकर,पद्मिनी माळी, संगीता वसेकर, विद्या वसेकर, रूपाली माळी, बालिका वसेकर, जनाबाई वसेकर,सविता वसेकर, या महिलांच्या बरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन सदस्य श्री हनुमंत वसेकर माजी अध्यक्ष श्री बिभीषण वसेकर रामदास माळी, विठ्ठल वसेकर, गोरख वसेकर, रणजित वसेकर, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर आयोजन मुख्याध्यापक किरण ढोबळे सह शिक्षक ज्ञानेश्वर दुधाने यांनी केले होते.