ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी चे विश्वस्त निरंजननाथजी यांच्या शुभहस्ते अक्षता कलश शोभायात्रेचे पूजन
करकंब प्रतिनिधी
आयोध्या श्रीराम मंदिर अक्षता कलश शोभायात्रेचे आयोजन करकंब ग्रामस्थ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.श्रीराम मंदिर सोमवार पेठ येथून ह्या शोभायात्रेस सुरुवात झाली.
सुरुवातीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवस्थानचे विश्वस्त निरंजननाथजी मा.जि.प.सदस्य बाळासाहेब देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राहुल पुरवत,योगेश कुलकर्णी,दंडे सर, मिलिंद उकरंडे ज्ञानेश्वर दुधाणे,मनोज पवार, निखिल व्यवहारे, बालाजी पवार,आकाश धोत्रे, अजय जाधव, उमेश बागडे, तुकाराम माने,श्रीकांत आरोळे विजय भागवत,प्रभाकर रसाळ, राजेंद्र करपे सचिन शिंदे,आणि सर्व करकंबकर मान्यवर मंडळी यांच्या शुभहस्ते श्री प्रभू रामरायाच्या मूर्तीचे व कलशाचे पूजन व आरती करुन कलश शोभायात्रेला सुरुवात झाली.या शोभायात्रेत विशेष म्हणजे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण सीतामाई आणि हनुमंत रामाचा सजीव देखावा सादर करण्यात आला होता.
तसेच बग्गीमध्ये अक्षता कलश ठेऊन सर्व करकंबकरांसाठी दर्शनासाठी आणला गेला होता.तसेच संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर सोमवार पेठ,काळा मारुती, इंदिरा नगर, मोडनिंब चौक, बसस्टँड, म्हसोबा, शुक्रवार पेठ, धाकटी वेस, विठ्ठल मंदिर, बाजार तळ,येथून टाळ मृदंगाच्या गजरात परत श्रीराम मंदिरात आगमन होत असताना ठिकठिकाणी कलशाचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी करकंबकरांनी अलोट गर्दी केली होती.शेवटी आरती करून आणि दंडे सरांनी या अक्षता कलश शोभायात्रेची माहिती देऊन अक्षता कलश शोभायात्रेची सांगता उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सर्व करकंब नगरी रामनामाच्या गजरात दुमदुमून गेली होती.ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी आर. एस.एस. चे सर्व पदाधिकारी बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते, श्रीराम प्रतिष्ठान चे सर्व सदस्य, यांनी विशेष परिश्रम घेत शोभायात्रा यशस्वी केली.
तसेच २२जानेवारी या श्रीराम अयोध्या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी ही श्रीराम मंदिर सोमवार पेठ येथे श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठान चे संस्थापक मिलिंद उकरंडे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे सचिव विजय भागवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.