शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचे वनविभागाच्या वतीने आवाहन
मायणी प्रतिनिधी विशाल चव्हाण
सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात खटाव तालुक्यातील चितळी येथे रात्री उशिरा काही स्थानिक नागरिकांना शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाले आहे. या भागात कधीही याआधी बिबट्या दिसून आला नव्हता मात्र चितळी परिसरात बिबट्या दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवसभर लाईट नसल्यामुळे शेतकरी रात्री शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी जात असत वनविभागाच्या वतीने शेतामध्ये जाताना नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज सकाळी वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या परिसराची पूर्ण पाहणी केली.