पंढरपूर प्रतिनिधी
फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, पंढरपूर यांचे वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिना निमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रविवार-7 जानेवारी 2024 श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी कॉलेज) गोपाळपूर येथे पारितोषिक वितरण करण्यात आले.
सबंध तालुक्यातुन 2813 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत _श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,सुस्ते प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे .
साक्षी शांतिनाथ चव्हाण,शर्वरी कैलास पाटील,आरती प्रभाकर गायकवाड,अनघा किशोर पवार,साक्षी सचिन चव्हाण यांनी यश संपादन केले आहे.पाचवी सहावी गटात कु.अपुर्वा अतुल चव्हाण हिचा प्रथम क्रमांक आल्याने तिला ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख तीन हजार रुपये आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. आज प्रशालेत सर्व विजेते व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे वरिष्ठ लिपीक राजकुमार ढगे व प्रशालेतील शिक्षकांच्या हस्ते गौरविण्यात आले.
उत्कृष्ट कार्याबद्दल विचारमंचच्या वतीने प्राचार्य सुधाकर पिसे यांनाही प्रशस्तीपत्र,शाल, पुष्पहार गुलाबपुष्ष देऊन सन्मानित करण्यात आले.आज प्रशालेतर्फे त्यांचाही गौरव करण्यात आला.विजेते स्पर्धक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रथमेश गावडे,गणेश खिलारे, श्रीकांत चंदनशिवे, तर नववी-दहावी गटाचे विलास दराडे, नवनाथ लोणकर आदिंचाही प्राचार्य पिसे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.फुले-शाहू-आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करुन त्यांना अभिप्रेत असणा-या मानवतावादी राष्ट्र उभारणीचे मंचचे कार्य कौतुकास्पद असून प्रशालेतील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांनी कोणत्याही स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी प्राचार्य पिसे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका हे तुमच्या सोबत असून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यशवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक तसेच प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे, पर्यवेक्षक रणजित शिनगारे या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ,सचिव ॲड. वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, जेष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे, मुकुंद देवधर, दिलीप आप्पा घाडगे, अनिरुद्ध भाऊ सालविठ्ठल, विजयकुमार माळवदकर सौ.सुनिता मोरे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रथमेश गावडे यांनी केले.अध्यक्षीय निवड गणेश खिलारे तर अनुमोदन श्रीकांत चंदनशिवे यांनी केले.आभार देवदत्त वाघ यांनी मानले.कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.