पंढरपूर प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती बार्डी शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली.आणि नवीन पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष रामदास माळी तर उपाध्यक्षपदी प्रवीण (भैय्या) कवडे यांची निवड करण्यात आली.
तसेच इतर सदस्यांची त्यामध्ये नितीन वसेकर,अनिल भारत वसेकर,दिपाली टेके,सविता वसेकर, वर्षा वसेकर,स्वाती शिंगटे, रुपाली वसेकर, वैशाली वसेकर,माधुरी पवार,लक्ष्मी पांचाळ,तसेच ग्रा.पं.सदस्या सुदामती माळी, शिक्षणप्रेमी बिभिषण वसेकर यांचीही बिनविरोध निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी मुख्याध्यापक किरण ढोबळे यांनी शासकीय नियमांची शाळा व्यवस्थापन समितीच्या सुचनांची माहिती दिली.तसेच नवीन समितीने शाळेच्या भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता,तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव काम करणं आवश्यक आहे. असे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले.
यावेळी शाळेच्या वतीने ज्ञानेश्वर वसेकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गोरख वसेकर, सुनिल वसेकर,विनोद वसेकर, समाधान वसेकर,अरुण माळी,अनिल कांतीलाल वसेकर,विद्या वसेकर,योगिता वसेकर,संगीता वसेकर आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी अधिक परिश्रम घेतले.