शेळवे प्रतिनिधी
शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला,प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे,संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे, संस्थापक सचिव अंकुश गाजरे तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले, तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेल्या प्रशालेतील सर्व सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाई फुले यांच्या चरणावर पुष्पांजली वाहून अनोखी मानवंदना दिली, प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड यांनी आपल्या शब्दातून आदरणीय सावित्रीबाई फुले यांचा जिवनपट विध्यार्थ्यांना उलगडून सांगितला.
दैनंदिन जीवनात मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व व मुलगी शिकल्याने कुटुंब आणि समाजाचा फायदा कसा होतो हे विध्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले..!!