सोलापूर प्रतिनिधी
केंद्रशासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री (Multipurpose Artificial Insemination Worker In Rural India ( MAITRI ) म्हणून प्रशिक्षण दयावयाचे आहे. व प्रशिक्षीत व्यक्तिची कृत्रिम रेतन व अनुषंगीक कार्य करण्यासाठी नियुक्ती करावयाची आहे. जेणेकरुन राज्यातील गायी - म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच त्यायोगे दुग्ध उत्पादनात वाढ होवुन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा 3 महिने कालावधीचा असून यामध्ये एक महिना क्लासरुम ट्रेनींग व 2 महिने प्रॅक्टीकल ट्रेनिंगचा समावेश राहील. क्लासरुम ट्रेनिंग पशुवैद्यकिय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येईल व प्रॅक्टीकल ट्रेनींग जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या ठिकाणी घेण्यात येईल.
हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण झालेला असावा. त्याचे वय 18 ते 35 वर्ष असावे.अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध होईल.
सदर प्रशिक्षण घेण्यासाठी ईच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण झालेला असावा, त्याचे वय 18 ते 35 वर्ष असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध होईल. सोलापूर, जिल्हयाकरिता सर्वसाधारण प्रवर्गातुन व अनुसुचित जाती प्रवर्गातुन असे एकुण 350 उमेदवारांची सदर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
तरी इच्छुक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ. एस. सी. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी , डॉ. एन. एल. नरळे केले आहे.
महिला बचत गटाच्या उत्पादित वस्तु विक्री व प्रदर्शनाचे आयोजन
सोलापूर दि. 24 (जिमाका) :- महिला बचत गटाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी व जाहिरात प्रचार प्रसार व्हावा या हेतूने दिनांक 26 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत माविम व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री आणि प्रदर्शन वोरोनोको हायस्कून, रंगभवन जवळ, हिराबाई देवकर प्रशालेजवळ, आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी, सोमनाथ लामगुंडे यांनी दिली.
विविध योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेले 10 हजार 930 स्वयंसहायता महिला बचत गट व 1 लाख 15 हजार 641 सभासद आहेत. बचत गटांच्या चिरकालीन संस्था टिकण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात लोकसंचलित साधन केंद्र व शहरी भागात शहरस्तरीय संघ ही संकल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या आधारे सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात एकूण 22 ग्रामीण व 10 शहरी केंद्र व्यवस्थापक व त्यांच्या अधिनस्त कार्यरत असलेला इतर कर्मचारी वर्ग, यांच्या माध्यमातून चालवत आहे.
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योम विकास प्रकल्प हा शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून गरीब व गरजुवंत कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक विकास साधने असा आहे. महिलांचे स्वयं सहाय्यता बचत गट स्थापन करून विविध वित्त पुरवठा संस्थाकडून वित्त पुरवठा केला जातो. त्यामधून महिलांनी शेती, बिगर शेती व्यवसायात भांडवल गुंतवणूक करून उद्योग व्यवसायाची उभारणी केली आहे. सदर उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी व जाहिरात प्रचार प्रसार व्हावा या हेतूने जिल्हास्तरावर महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी, सोमनाथ लामगुंडे यांनी केले आहे.