म्हसवड प्रतिनिधी
माणच्या मातीने अनेक अधिकारी घडवले आहेत, याच मातीने मला ही घडवले आहे, या मातीने घडवलेले अनेक अधिकारी राज्यभरात सर्वत्र प्रशासकीय सेवेत कार्यरत असले तरी या सर्वांची मातीशी जोडलेली नाळ अतुट अशी आहे, त्यामुळे आज मातीतील पत्रकारांकडुन माझा जो गौरव केला केला तो माझ्यासाठी प्रेरणादाई ठरणारा असुन मातीतील ओलावा यापुढेही असाच टिकुन राहिल अशी अपेक्षा ही यावेळी म्हसवडचे भुमीपुत्र व माळशिरस चे पी. आय. राजेंद्र टाकणे यांनी व्यक्त केली.
माण तालुका डिजीटल मिडीयाच्या वतीने माळशिरस येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी टाकणे यांचा पुष्पगुच्छ देवुन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना टाकणे यांनी सांगितले की पोलीस अधिकारी म्हणुन काम करीत असताना अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहताना सन्मानित झालो आहे, मात्र आज माझ्या मातीतील पत्रकारांकडुन जो माझा सन्मान झाला तो माझ्यासाठी प्रेरणादाई ठरणारा आहे. पत्रकार हा समाजाचा लिडर म्हणुन काम करीत असतो त्याची नजर चौफेर असते त्यांच्या नजरेतुन काही सुटत नाही त्यामुळे पत्रकारांशी अनेकजण फटकुन रहातात, मात्र माझ्यासाठी पत्रकार हे नेहमीच मार्गदर्शक राहिले आहेत, त्यांच्यामुळे पोलीसांनाही अनेक गुन्ह्याची उकल करण्यात मदत होत असते.
यावेळी डिजिटल मिडीयाचे माण तालुका अध्यक्ष बापुसाहेब मिसाळ, जेष्ठ पत्रकार विजय टाकणे, महेश कांबळे, अहमद मुल्ला, विशाल माने आदी उपस्थित होते.