निषाद व्यास यांचे सुमधुर स्वरांनी करकंबर कलारसिक मंत्रमुग्ध
करकंब प्रतिनिधी
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी सोहळा करकंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.दररोज अखंड सात दिवस श्रीराम जय राम जय जय राम नामस्मरण करीत उदयोन्मुख युवा गायक निषाद व्यास यांचे सुमधुर अभंगगायनाने वातावरण भक्तिमय झाले.सुरुवातीला राग दुर्गा मधील एकतालातील शास्त्रीय बंदिश सादर केली.त्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्रांने सुरुवात करुन आरंभी वंदीन आयोध्येचा राजा,कानडा राजा पंढरीचा, विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, चैतन्याचा गाभा,संतभार पंढरीत,वृंदावनी वेणू आदी संतरचना गात शेवटी पद्मविभूषण राजनसाजन मिश्रा यांनी स्वरबद्ध केलेली भैरवी धन्य भाग सेवा का अवसर पाया गाऊन रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले..त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला रोहन पंढरपूरकर, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम माधव लिमये,टाळ माऊली पिसे यांनी केली.तसेच श्री महारांजांच्या पुण्यतिथी वेळी पहाटे काकडारती वृषाली बोधे यांचे गुलालाचे प्रवचन प्रतिमेवर पहाटे पुष्पवृष्टी झाली.तसेच प्रदक्षिणा मार्गावरुन पालखी मिरवणूक काढून दुपारी १२वा.आरती होऊन श्रीम.शालन रामदास टकले यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.यावेळी अनेक करकंब कर रामनामप्रेमी आणि जपकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी जपसंकुलाचे सेवेकरी मंगल रसाळ, प्रभाकर रसाळ,विजय भागवत, ज्ञानेश्वर दुधाणे, महादेव दुधाणे, दत्तात्रय इदाते, नवनाथ कांबळे, माऊली पिसे,का़तीलाल टकले, आलेकर बंधू,उषा पिसे,संध्या भागवत, संजीवकुमार म्हेत्रे,केशर केशर टकले,दादा धोत्रे, सत्यवान देशमुख,श्रेयश पंडीत,मोहन बोधे, यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट यांचंही अनमोल सहकार्य लाभत आहे.सचिन घाडगे,सचिन मुजमुले सुहास निंबाळकर,यांनी साऊंड सिस्टीम आणि सजावटीसाठी विशेष सहकार्य केले.