भाळवणी प्रतिनिधी
चंद्रभागा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव काळे प्रशालेत प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे होते तसेच सहकार शिरोमणी चे उपाध्यक्ष भारत कोळेकर हे उपस्थित होते.
तसेच भाळवणी गावचे सरपंच रणजित जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील ,गोरख जाधव ,जय नाना देशमुख, अरुण नलवडे ,प्रताप काका मेहत्रे,कार्यकारी संचालक झुंजार आसबे तसेच चंद्रभागा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव हनुमंत जमदाडे तसेच दाऊद भाई शेख ,पत्रकार प्रशांत माळवदे ,सहकार शिरोमणी कारखान्याचे सर्व खाते प्रमुख पदाधिकारी पालक ग्रामस्थ विद्यार्थी व प्रशालेचे मुख्याध्यापक संजय काळे आदि मान्यवर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास चौगुले यांनी केले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी प्रयत्न केले.यावेळी विद्यार्थी पालक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.