भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत च्या वतीने ध्वजारोहणाचा व ग्रामसभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच रणजित जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी डी एस वाघमारे यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. त्यानंतर ग्रामसभेच्या वेळी विविध विकास कामावर चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्व ग्रामस्थांनी पाणीपट्टी व घरपट्टी वरून सहकार्य करावे. घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतेही कर वाढ न करता फक्त घराच्या मोजमाप प्रमाणेच कराची फेर आकारणी करणे, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम तात्काळ सुरू करणे तसेच गावातील पाईपलाईन साठी रस्ते खोदले आहेत ते व्यवस्थित बुजवून रस्त्यावर मुरमीकरण,खडीकरण करावे. कुष्ठरोग निर्मूलन करण्यासाठी शपथ घेण्यात आली. लोकसेवा हक्क अध्यादेशाची माहिती वाचून दाखवण्यात आली. मोदी आवास योजनेची यादी वाचून दाखवण्यात आली. इच्छुकांनी मोदी आवास योजनेसाठी नाव नोंदणी करण्याचेही आवाहन करण्यात आले. रमाई आवास योजनेतील मंजुरी आदेश वाचून दाखवण्यात आला तसेच गावात नवीन राष्ट्रीयकृत बँक सुरू करण्यासाठी ठराव करण्यात आला.
यावेळी सरपंच रणजित जाधव, दीपक गवळी, विजय शिंदे, सुनील पाटील, राजकुमार पाटील, जयराम शिंदे, विठ्ठल चौगुले,अर्जुन लिंगे,नितीन शिंदे,वनिता लिंगे, उपसरपंच सविता लोखंडे ,पुनम गवळी,स्वाती माने,सचिन कुचेकर, प्रवीण गायकवाड, सचिन भोसले,अमोल लिंगे, शशिकांत विभुते,निहाल शेख,मुन्ना इनामदार, आदि मान्यवर उपस्थित होते.
आज आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सहभागी होऊन गावाच्या विकास कामांवर चर्चा केली यापुढेही असे सहकार्य करावे असे आवाहन सरपंच रणजित जाधव यांनी केले.