श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा निमित्ताने विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नारदीय कीर्तन, महिलांच्या विविध स्पर्धा, व्याख्यान, हळदीकुंकू तिळगुळ बक्षीसं वितरण
करकंब प्रतिनिधी
श्री शाकंभरी पौष पौर्णिमा निमित्ताने श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन दिनांक १७ जानेवारी ते १५जानेवारी पर्यंत चौंडेश्वरी मंदिर येथे होत असल्याचे ट्रस्ट चे अध्यक्ष मिलिंद उकरंडे सचिव विजय भागवत यांनी सांगितले.
प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक १७ तारखेपासून ५:३०वा. पहाटे काकड आरती,तसेच ८:००वा.देवांगपुरान वाचन, दुपारी २:०० वा.महिलांच्या विविध स्पर्धा त्यामध्ये होऊ द्या धिंगाणा,,संगीत खुर्ची, पाककला स्पर्धा,जोडी जोडी (महिला पुरुष)स्पर्धा,झटपट स्पर्धा,गीतगायन स्पर्धा,आणि रांगोळी स्पर्धा अशा महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून संध्याकाळी ६:०० महिला भजनी मंडळाचे भजन,आणि आरती आणि दररोज रात्री ८:००वा.ख्यातनाम राष्ट्रीय कीर्तनकार संदीप बुवा मांडके पुणे यांचीच सातही दिवस नारदीय कीर्तन संपन्न होणार आहे.
त्यांना तबलासाथ ज्ञानेश्वर दुधाणे शिवराज पंडीत ओंकार व्यवहारे राम अनवते वैभव केंगार आदी देणार असून शनिवार दिनांक २० रोजी कोष्टी समाज युवकांच्या वतीने बनाळी येथून ज्योत प्रज्वलीत करून आणणार आहेत,गुरुवार दिनांक २५ जानेवारी रोजी शाकंभरी पौष पौर्णिमा दिवशी सायंकाळी ५:००वा.श्री चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून पालखी मंदिरात आले नंतर संध्याकाळी नवनाथ टकले यांच्या वतीने समस्त करकंब कोष्टी समाजबांधवांना समाकुळ महाप्रसाद दिला जाणार आहे.त्यामुळे मिरवणुकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,तसेच २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४:००वा.महिलांच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, पुरस्कार वितरण आयोजित करण्यात आला आहे.
तरी या भरगच्च केलेल्या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद उकरंडे विजय भागवत आणि सर्व ट्रस्टी यांनी केले आहे.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोष्टी समाज बांधव तसेच महिलावर्ग अधिक परिश्रम घेत आहेत.