सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमध्ये आणि मलेशिया येथील 'इंटी' विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याची माहिती जेष्ठ संशोधक व माजी कुलगुरू तथा सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. एस.एच. पवार यांनी दिली.
पुढे बोलताना डॉ. पवार यांनी सांगितले की, या करारा अंतर्गत शैक्षणिक उपक्रमाची देवाण-घेवाण, संशोधनाचे अदान - प्रदान, दोन्ही संस्थांचे संयुक्त प्रकाशन व संशोधन उपक्रम राबविणे, संशोधकांच्या भेटी, विद्यार्थ्यांची गतीशीलता, शैक्षणिक कार्यक्रम, दोन्ही पक्षांनी परस्पर सहमती दर्शविलीले इतर उपक्रम आयोजित करणे,शैक्षणिक साहित्य व इतर माहितीची देवाण- घेवाण करणे असे या कराराचे स्वरूप आहे. सदरचा करार पाच वर्षासाठी आहे.
या सामंजस्य करार करण्यासाठी इंटी विद्यापीठा चे डॉ. कुमार कृष्णन आणि डॉ.फु किम हे कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.सिंहगड इन्स्टिट्युट च्या वतीने कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय नवले, डॉ. एस. एच. पवार, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रविंद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी सिंहगड इन्स्टिट्यूट मार्फत सुरु असलेले संशोधन प्रकल्प व संशोधन उपक्रमांची माहिती इंटी विद्यापीठाच्या शिष्ट मंडळाला दिली. इंटी विद्यापीठाशी होत असलेल्या या सामंजस्य करारामुळे सिंहगड इन्स्टिट्युट मधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांशी, शिक्षकांशी, विद्यार्थांशी शैक्षणिक अदान - प्रदान करण्याची संधी यानिमित्त मिळणार आहे .