भाळवणी प्रतिनिधी
75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकासवाडी या शाळेत उत्कृष्ट ज्ञानदानाचे काम केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम रमेश सांगले आणि उपशिक्षक पोपट सुखदेव मस्के या दोघांचा आणि अंगणवाडी सेविका सुनीता देठे यांचा सत्कार विकासवाडी गावातील पालकांनी,ग्रामस्थांनी केला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी देठे, उपाध्यक्ष सागर लोखंडे व सर्व सदस्य त्याचबरोबर धोंडेवाडी गावचे युवा नेते महादेव देठे विष्णुपंत लोखंडे, शिवाजी लोखंडे, शिवाजी देठे, महादेव देठे, नितीन लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सागर लोखंडे, अनिल लिंगडे, डॉ. राजाभाऊ देठे, सचिन देठे, शहाजी देठे, सागर लोखंडे,कुमार माने, रणजीत खंडागळे, वसंत लिंगडे अंगणवाडी सेविका सुनीता देठे, आणि मदतनीस मनीषा साळुंखे उपस्थित होते.