भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी येथील अनेक दिवसापासून एसटी स्टँड पिकअप शेड प्रलंबित होते माझ्या महिला भगिनी शाळेतील मुले मुली विद्यार्थी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक इत्यादी ना उन्हात पावसात थंडीत रोडवर उभे राहावे लागत होते.
याकरिता राजश्री ताड यांनी एसटी स्टँड होण्यासाठी एसटी महामंडळ अधिकारी, रस्ते विकास महामंडळ अधिकारी पुणे यांना वेळोवेळी निवेदन दिले होते. त्यांनी त्या निवेदनाची दखल घेतली नाही. त्यानंतर दिनांक 3 /9 /23 रोजी एसटी स्टँड होण्यासाठी उपोषण केले. तात्काळ रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी पुणे यांनी एसटी स्टँड लवकर करण्यात येईल असे आश्वासन देऊनही एसटी स्टँड होण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत होते.
यावेळी राजश्री ताड म्हणाल्या की,मी सोलापूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांना भेटून भाळवणी येथील एसटी स्टँड चा प्रश्न मार्गी लावावा म्हणून त्यांना विनंती केली होती. त्यांनी दहाच दिवसात एसटी स्टँड होईल असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आज पूर्ण झाले. भाळवणी येथे स्टॅन्ड पिकप शेड उभे राहिले मी प्रथमता जिल्हा अधिकारी यांना पंढरपूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने त्यांना धन्यवाद देते.
सदर एसटी स्टँड होण्यासाठी राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी ताई खडसे राष्ट्रवादी महिला पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राध्यापक कविताताई म्हेत्रे, राष्ट्रवादी सोलापूर जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई शिवपुरे, भाळवणी गावचे सरपंच राजू पाटील, धैर्यशील निंबाळकर तालुक्यातील सर्व महिला पदाधिकारी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला शाळेतील विद्यार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले.
अनेक वर्ष एसटी स्टँड चे पिकप शेड उभारली जात नव्हती. त्यामुळे विद्यार्थी, महिला, प्रवासी यांना उन्हात उभे राहावे लागत होते. अखेर राजश्री ताड यांच्या प्रयत्नांना यश येऊन येथील एसटी स्टँड उभारले गेल्यामुळे राजश्री ताड यांचे महिलांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.