तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहर व तालुक्यातील गरजू पत्रकार बांधवांना शासनाने नव्याने सुरू केलेल्या ई शिधापत्रिका तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांचे हस्ते त्यांच्या दालनातच वितरित करण्यात आले.
शासनाच्या वतीने डिजिटल सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी आता शिधापत्रिकाधारकांनाही ई शिधापत्रिका वितरित करण्याचे काम सुरू आहे.गरजू व गोर गरीब जनतेला ई शिधापत्रिकेच्या माध्यमातून आरोग्य उपचारासाठी लाभ होणार आहे.
स्वस्त धान्य दुकानांमध्ये मागील अनेक वर्षापासून नागरिकांना हाताचे ठसे घेतल्यानंतर शिधापुस्तीकेत नोंद करुन धान्य दिले जात होते. त्याच धर्तीवर आता शिधापुस्तीके ऐवजी ई शिधापत्रिकेच्या माध्यमातून नोंद करुन धान्य दिले जाणार आहे.
डिजिटल युगामध्ये डिजिटल बँकिंग तसेच वस्तू घेताना खरेदी करताना अगर व्यवहार करताना डिजिटल चा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने पुरवठा विभागातूनही ई शिधापत्रिकेच्या माध्यमातून शिधा दुकानातून धान्य घेता येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी रेशन धान्य पुस्तिकेच्या वापर होत होता त्याच ठिकाणी आता ई शिधापत्रिकेचा वापर होणार असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांनी दिली.
पंढरपूर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांना मीडिया रिपोर्टर संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने ई शिधापत्रिकेसाठी पाठपुरावा करून नव्याने सुरू झालेल्या ई शिधापत्रिकाचे वितरन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले.