सोलापूर प्रतिनिधी
श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत १८८५ तर रांगोळी स्पर्धेत ८१३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पाच गटात या स्पर्धा घेण्यात आल्या.
निलम नगर येथील नेताजी प्राथमिक मराठी, इंग्लिश मिडियम व माध्यमिक प्रशालेत आयोजित रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य रविशंकर कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार,पर्यवेक्षक गौरीशंकर आंळगे, कलाशिक्षक शैलेश स्वामी, मिनाक्षी वांगीकर , उमादेवी कुंभार उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेत १३७५ तर रांगोळी स्पर्धेत ४७० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अश्विनी गंगुल, तेजस्विनी जोगीपेटकर, सुजाता कुंभार, ज्योती ढगे, कल्पना आकळवाडी,जयश्री बिराजदार,वैशाली इंडे, विजयालक्ष्मी माळवदकर, सविता रामशेट्टी, भाग्यश्री महाजन,किरण कदम,भारती पाटील,सुनीता पवार आदींनी परिश्रम घेतले.
विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित चित्रकला स्पर्धेत ५१० व रांगोळी स्पर्धेत ३४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उदघाटन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे व मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे यांनी पूज्य महास्वामीजींच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वैशाली गुजर,शीतल चमके,उज्ज्वला भांड, सुजाता फुलारी,संगीता नरगिडे आदींनी परिश्रम घेतले.