पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील विद्यार्थ्यांसाठी प्रेपइन्स्टा व लिंक्डइन प्लॅटफॉर्म या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यशाळेमध्ये सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरता येणे हि काळाची गरज बनली आहे. तसेच बऱ्याच आंतरराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या या वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांच्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज पूर्ण करतात. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये यासाठी प्रशिक्षण व वापरण्याची माहिती व्हावी या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून नोकरीच्या संबंधी तयारीसाठी या दोन्ही प्लॅटफॉर्मचा उपयोग होणार आहे. सदर कार्यशाळे मध्ये प्रेपइन्स्टा प्लॅटफॉर्म बद्दल केदार काशीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच लिंक्डइन प्लॅटफॉर्म बद्दल प्रा. मानसी नवले यांनी मार्गदर्शन केले.
यामध्ये प्रेपइन्स्टा प्लॅटफॉर्मचा वापर वेगवेगळ्या कंपनीसाठी लागणारे ऍपटिटयूड, कोडिंग, मुलाखत, ग्रुप डिस्कशन याची तयारी प्रथमवर्षापासून करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच वेगवेगळ्या कंपनीच्या जॉब ओपनिंग व त्यासाठी लागणाऱ्या अद्ययावत प्रशिक्षणाची माहिती मिळवण्यासाठी लिंक्डइन प्लॅटफॉर्मचा वापर कसा करावा या बद्दल प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कॉलेज मधील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर काटेकर, प्रा. अनिल निकम आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.