सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेतील ईरण्णा मादगुंडी व श्रीशैल जेऊरे या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शेवगाव अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि १३ व १४ डिसेंबर रोजी झालेल्या पुणे विभागीय शालेय कॅरम स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या ईरण्णा मादगुंडी व श्रीशैल जेऊरे या दोन खेळाडूंनी सतरा वर्षे वयोगटात घवघवीत यश संपादन केले.
त्यांची हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक विठ्ठल कुंभार ,सुरेश बिराजदार,अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार ,प्राचार्य रविशंकर कुंभार,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले आदींनी अभिनंदन केले.