मोहोळ प्रतिनिधी
सध्या मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच नावाची चर्चा होताना दिसून येतंय, त्यामध्ये तालुक्यात मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता देत असतानाच काही कुटुंबाच्या अडीअडचणीच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय व मोहोळ तालुक्याचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या नावाची.
ते असे की तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या हाकेला ओ देत तांबोळी या गावातील नितीन गायकवाड या अपघात झालेल्या युवकाला आपल्या स्वखर्चातून रोख 50000 रुपयांची मदत करण्यात आली, नेतृत्व आणि दातृत्व असलेल्या अश्या नेत्यांकडे जनता पाठीमागे राहत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे..अश्या एक ना अनेक गरजू कुटुंबाच्या मदतीला राजू खरे धावून आल्याचे अनेक माध्यमातून समोर आले आहे, गायकवाड कुटुंबातील या युवकाचा अपघात झाले असता एका पायाचे आपरेशन झाले, मूळातच घरात आठरा विश्व दारिद्र, घरात आईला बोलता येत नाही, तर वडीलाचे काही वर्षांपूर्वी छत्र हरविले.
असे असताना अपघातात पायात रॉड असल्याच्या कारणाने कुठल्याही पद्धतीच आर्थिक सोर्स नसल्याने स्वतःच कामे करत असल्याचे दिसून आले, ह्या सर्व गोष्टींची माहिती उद्योजक राजू खरे यांना मिळताच तत्काळ त्यांनी त्या कुटुंबाच्या घरी जाऊन रोख 50 हजार रुपयाची आर्थिक मदत देत एक प्रकारे त्या कुटुंबाला धीर देण्याचा देखील प्रयत्न केला असता कुटुंबांनी देखील राजू खरे यांचे आभार मानले.