नांदेड प्रतिनिधी
नांदेड जिल्हा मुद्रक संघाच्या वतीने महाराष्ट्र मुद्रण परिषदेची सभा नांदेड येथे आयोजित करण्यात होती. मुद्रण परिषदेची सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महाराष्ट्राच्या विविध भागातून परिषदेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. परिषदेचे मुखपत्र असलेल्या ’मुद्रा’ या मासिकाचे स्वरुप अधिक मुद्रकस्नेही बनवणे, परिषदेचे प्रतीक असलेल्या जुन्या बोधचिन्हाला नव्या शैलीत बदलण्यासाठी एका व्यापक स्पर्धेद्वारा नव्या बोधचिन्हाची निवड करणे, महाप्रिंट एक्सपो प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत भूमिका ठरवणे, घटना दुरुस्तीचा मसुदा ठरवणे आदीबाबत साधक-बाधक चर्चा करुन सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांनी मुद्रण व्यवसायाचे प्रश्न सोडवून प्रगतीचे मार्ग शोधण्यासाठी परिषद सक्रिय असल्याचे सांगून आपला पाया व्यापक करण्यासाठी आजीव सदस्य वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली. सचिव विनय छाजेड व कोषाध्यक्ष कमलेश धारगळकर यांनी ताळेबंद व हिशोबपत्रके मंजुरीस्तव सादर केली.
यावेळी पत्रकार अधिस्वीकृती राज्य समितीवर निवड झालेले तथा दै. प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, लातूर विभागीय अधिस्वीकृती समितीवर निवड झालेले प्रल्हाद उमाटे, अमोल अंबेकर व विजय जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला व सोबतच अधिस्वीकृती पत्रकार तथा मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, मुखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेले शिवाजी कोनापुरे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. दै.प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी मुद्रकांच्या समस्या सोडविण्यासाठी पत्रकार या नात्याने मुद्रक संघास संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
दुसर्या सत्रात नांदेड जिल्हा मुद्रक संघाच्या बैठकीत सर्व विविध ठराव सर्वसंमतीने मुद्रक बांधवांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आले. तसेच संघटनेची पुढील आखणी मजबूत करण्यासाठी भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा मुद्रक संघाची नूतन कार्यकारीणी निवडण्यात आली.
त्यामध्ये अध्यक्षपदी देवदत्त देशपांडे, सचिवपदी भारत गट्टेवार तर कार्याध्यक्षपदी प्रशांत बोडखे व अतुल भुरेवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी म.अयुब म.सरवर व संतोष मुगटकर यांची निवड झाली. कोषाध्यक्ष प्रशांत गुर्जर, प्रवक्ते शिवानंद सुरकुटवार, संघटक आनंद नादरे, सरचिटणीस समीर कुलकर्णी, समन्वयक पत्रकार शिवाजी कोणापुरे, सहसचिव किशन देशमुख, सहकोषाध्यक्ष गणेश लोखंडे, संपर्कप्रमुख अ.वहाब अ.रशीद, प्रसिद्धीप्रमुख मारोती लकडे, सहसंघटक अ.रज्जाक अ.गणी कार्यकारिणी सदस्य सदानंद देशमुख तर सल्लागार भुमन्ना आक्केमवाड, श्रीहरी नीलावार, मार्गदर्शक सतीश कुलकर्णी, नंदकुमार केशटवार, सय्यद मौला तसेच तालुका प्रमुख म्हणून विनय दुरकेवार, धनराज श्रीरामवार भोकर, लक्ष्मीकांत मुदिराज उमरी, देवीदास मुदकुलवार देगलूर, ज्ञानेश्वर वारकड कंधार, श्रीकांत अग्रवाल मुखेड आदींची निवड सर्वानुमते करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन सतीश कुलकर्णी यांनी केले व आभार श्रीहरी निलावार यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातून बहुसंख्य मुद्रक बांधव उपस्थित होते.