भाळवणी प्रतिनिधी
भिमनगर भाळवणी येथे सालाबाद प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर युथ असोसिएशन (DAYA) या सामाजिक संघटनेच्या वतीने विविध शैक्षणीक ,क्रीडा,स्पर्धा परीक्षा मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.तसेच मुलांना अभ्यासाची गोडी लागावी असे वातावरण निर्माण व्हावे या उदात्त हेतूने तक्षशिला अभ्यासिकेचे उद्घाटन DAYA ग्रूप चे सदस्य प्रा. डॉ.शाहीर गायकवाड व निता नंदकुमार उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी महिलांची उपस्थिती प्रेक्षणीय होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान DAYA ग्रूप चे अध्यक्ष प्रा. नंदकुमार उबाळे यांनी भूषवले. तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा मार्गदर्शक नवनाथ गायकवाड हे उपस्थित होते. पाहुण्यांचे व समाजबांधवांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी मारुती भोसले यांनी केले,तर सूत्रसंचालना मधून बामसेफ चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष जालिंदर गायकवाड यांनी बामसेफची शैक्षणिक,सामाजिक चळवळी बाबत, समाजात शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांच्या जाणिव जागृती व दया फाऊंडेशन चे कार्य या विषयी मार्गदर्शन केले.तसेच मोहन भोसले व प्रमोद भोसले यांनी दया ग्रूप च्या अभिनंदन करण्यात आले.