पंढरपूर प्रतिनिधी
ज्यांचं कोणी नसतं , त्यांना मदतीचा हात देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं अशाच प्रकारचे कर्तव्य राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.संजय मुळे यांच्यावतीने आज भाऊबीज निमित्त अनाथ व निराधार आशा गरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले.
भाऊबीजेचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय मुळे यांनी भाऊबीजला पंढरपुरात असणाऱ्या, कष्टकरी व अनाथांना साडी व फराळ यांचे वाटप करण्यात आले. संजय मुळे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
सामाजिक बांधिलकी जपणारा एक युवा पदाधिकारी नेहमीच आपल्या दातृत्वाने ते समाजातील कष्टकरी उपेक्षित जनतेच्या मदतीला नेहमीच धावून येतात.