हैद्राबाद प्रतिनिधी
स्वर दिपावलीच्या निमित्ताने तत्वा आर्ट हैद्राबाद आणि केशव मेमोरियल गृप आयोजित आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम गायिका मंजुषाताई पाटील-कुलकर्णी यांच्या गायनाची प्रभात कालीन अप्रतिम मैफिल बोट्यानिकल गार्डन कोंढापूर येथे संपन्न झाली.
सुरुवातीला राग विभास बडा ख्याल आणि त्याला जोडून बंदिश गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करत अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली.त्यानंतर मराठी रंगभूमी दिनाच औचित्य साधून ख्यातनाम कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांच्या अप्रतिम प्रभावी निरुपणाने वातावरण उत्साहपूर्ण बनवले.नाट्यगीत सुरत पिया बिन हे सुरांनो चंद्रमा आणि याद पिया की आये ठूमरी गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.त्यानंतर भक्तीगीत आणि अभंग यातील फरक अनेक उदाहरणे देत आफळेबुवांनी वातावरणात अधिक रंगत आणली.त्यानंतर अवघे गर्जे पंढरपूर,म्हारो घर आवोजी, रसिकांच्या आग्रहास्तव भाग्यदा लक्ष्मी बारंम्माने टाळ्यांच्या कडकडाटात रसिक श्रोत्यांनी प्रतिसाद दिला त्यानंतर श्रीरंगा कमलाकांता,आणि जोहार मायबाप जोहार या अतिशय सुंदर चोखोबांच्या अभंगनाने या अतिशय सुंदर पहाटेच्या स्वर दिपावलीच्या मैफिलीची सांगता केली.यावेळी त्यांना तितकीच सुंदर समर्पक साथसंगत तबला प्रशांत पांडव हार्मोनियम अभिनय रवंदे, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे साईडरिदम अपूर्व द्रविड स्वरसाथ -देवश्री दंडवते तनिष्क अरोरा यांनी केली.यावेळी ही स्वर दिपावलीचा कार्यक्रम ऐकायला पहाटे हैदराबाद कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला आणि दिपावलीच्या या सुंदर कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. देशपांडे आभार अखिलेश यांनी मानले.त्यानंतर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अनेक प्रकारचे सहकार्य केले.ते अजीत रॅगणेकर आणि रामकृष्ण सातवलेकर त्यांचा आणि कलाकारांचा सन्मान करत मैफिलीची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तत्वा आर्ट च्या सर्व पदाधिकारी आणि संगीतसाधकांनी अधिक परिश्रम घेतले.