मंगळवेढा प्रतिनिधी
महारष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक माधवराव यादव यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड झाल्याबद्दल आमदार समाधान दादा आवताडे यांच्या कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.यावेळी मंगळवेढ्याचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे,मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी शुगर चे माजी संचालक राजेंद्र पाटील चेअरमन,चोखामेळा नगरचे सरपंच शिवाजी सरगर, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी,पिंटू मोहिते,बाबा कोंडूभैरी, स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे,विकास पुजारी व विविध स्थरावरील मान्यवर आदीं उपस्थित होते.