मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
जुईनगर मधील श्री स्वामी समर्थ मठ ,जुईनगर येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सुतार यांच्या हस्ते व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती केंद्र याचा शुभारंभ १२ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आला. समर्थ सोशल फाउंडेशन व शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेले व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती अभियान २०१५ पासून सुरू असून सामाजिक भावनेने हजारो लोक समाज हिताचे हे कार्य स्वयंसेवी भावनेने अहोरात्र हे काम करत आहेत. लाखो कुटुंबाला व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती मध्ये फायदा झालेला आहे.
संस्थेचे हे सामाजिक अभियान लोकांपर्यंत पोहोचवणे व लोकांना योग्य मार्गदर्शन करणे व त्यांना त्यांच्या व्याधीतून मुक्त करण्यासाठी भालचंद्र माने यांनी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी पदाद्वारे समाजामध्ये वाढलेले व्यसन व मधुमेह अशा गंभीर समस्या वर आपल्या उपजत समाजसेवेच्या भावनेतून लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने श्री स्वामी समर्थ मठ संस्थापक अध्यक्ष संतोष सुतार साहेब व सचिव प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेहमुक्ती, व्यसनमुक्ती केंद्र लक्ष्मीपूजन च्या दिवशी सुरू करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना मठाचे अध्यक्ष संतोष सुतार यांनी सांगितले की समाजात मधुमेह व नशा पान यांची गंभीर समस्या होत चालली आहे. त्या दृष्टीने अशा प्रकारच्या उपक्रमातून लोकांना जीवन सुधारण्यासाठी नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले.
मठाचे सचिव प्रदीप पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे या उपक्रमास शुभेच्छा देऊन सांगितले की हा एक चांगला उपक्रम आहे आणि लोकांनी मधुमेह मुक्ती, व्यसनमुक्ती, वेदना मुक्ती तसेच शिशु रक्षेसाठी लोकांनी याचा लाभ घ्यावा असे सुचित केले.पुढील मोबाईल वर संपर्क साधावा: 9324374729