माळशिरस तालुका प्रतिनिधि जयराम घाडगे
वेळापूर तालुका माळशिरस येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सभासदांना २००७ पासून गेली १७ वर्षा पासुन हि संस्था १५ टक्के लाभांशाचे वाटप करण्यात येत आहे.
सुरुवातीला सोसायटीचे ज्येष्ठ सभासद सुधाकर इनामदार दत्तात्रय बनकर हाजीलाल पठाण विठ्ठल मुंगुसकर युवराज राजे भोसले भीमराव मेटकरी दशरथ मंडले यांच्या हस्ते प्रतिमापूजन होऊन त्यांच्या हस्ते सभासदांना लाभांश वाटप करण्यात आला . यानंतर वेळापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन व भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख यांनी संस्थेचा आढावा घेताना सांगितले की संस्थेने सभासदांना चालू वर्षात ६ कोटी रुपयांचे वाटप केलेले आहे व दीपावली सणासाठी संस्थेच्या सभासदांना २० लाख रुपये लाभांश वाटप करण्यात आला असल्याचे सांगून, सदर संस्था ही महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ,सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील, आमदार रामभाऊ सातपुते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, भाजपा जिल्हा संघटन चिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कै सूर्यकांत दादा माने देशमुख यांनी त्यांच्या च्या तत्त्वानुसार व आखून दिलेल्या धोरणानुसार संस्थेचे कामकाज चालू असल्याचे सांगितले वेळापूर गावाची लोकसंख्या बत्तीस हजार असताना सुद्धा या संस्थेचे उत्तम असे नियोजन असल्याने वेळापूर मध्ये एकच संस्था कार्यरत आहे असे सांगितले
यावेळी संस्थेचे संचालक आनंदराव माने देशमुख, अर्जुन भाकरे, मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब माने देशमुख, दत्तात्रय माने, विश्वजीत माने देशमुख, श्रीधर देशपांडे, चंद्रकांत क्षीरसागर ,आप्पा अडसूळ, संस्थेचे सचिव भागवत मिले, क्लार्क शिवाजी आडत, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार श्रीधर देशपांडे यांनी मानले.