करमाळा प्रतिनिधी
प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला मराठा समाजाला तात्काळ सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली.
या पाठिंब्याचे पत्र सकल मराठा समाजाचे उपोषणकर्ते विजय लावंड हनुमंत मांढरे यांच्याकडे देण्यात आले तसेच या निवेदनाच्या प्रती तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे ज्येष्ठ नेते हनुमंत बरडे गणेश कांबळे राजू पवार विजय पवार किरण पवार अमोल शिंदे चंद्रकांत जगताप सचिन वायकर पिंटू शिंदे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते .