नको असलेले द्या, हवे असलेले घेऊन जा..
माणुसकी फॉउंडेशन सोलापूर च्या वतीने सातरस्ता येथे सलग आठव्या वर्षी उपक्रमाचे झाले उदघाटन
सोलापूर प्रतिनिधी
नको असलेले द्या हवे असलेले घेऊन जा या धर्तीवर कार्य करणाऱ्या माणुसकी फॉउंडेशन सोलापूर च्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. दर वर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीच्या तोंडावर गरजू कुटूंबाना नवीन अथवा घालणे योग्य जुने कपडे मिळावे या उद्देशाने सुरु केलेल्या माणुसकीच्या भिंतीचे उदघाटन जेष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भारतीय जनता पार्टी चे कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, प्रा. केशव शिंदे, महेश धाराशिवकर, केतन वोरा, अविनाश महागावकर, दशरथ वडतिले व ज्ञानेश्वर म्याकल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना विवेक घळसासी यांनी विचार व्यक्त करताना समाजामधील प्रत्येक जण सुखी संपन्न व्हावा आणि एक दिवस हे दारिद्र्य दूर होऊन माणुसकीच्या भिंतीची गरज संपावी असे मत बोलताना व्यक्त केले. सदर उपक्रम हा तीन दिवस ३,४,५ नोव्हेंबर २०२३ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार असून आपण नको असलेले कपडे व इतर साहित्य घेऊन येऊ शकता प्राप्त कपडे हे पहिल्यांदा चांगले, भुरकट, खराब अशी वर्गवारी करून समोर ठेवलेल्या बॉक्सेस मध्ये वाटपासाठी ठेवले जाणार असून त्यामुळे गरजू कुटुंबाना अगदी हवे तसे कपडे या ठिकाणाहून मिळतील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष हिंदुराव गोरे यांनी बोलताना व्यक्त केला व सहभागी होण्याचे आवाहन केले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिकेत चनशेट्टी, पंकज वाघमोडे, जयेश रामावत, गौरीशंकर कराळे, समर्थ उबाळे, किशोर कलबुर्गी, प्रणय उबाळे, प्रा. संजीव म्हमाणे , प्रा.संदीप लिगाडे, प्रेम भोगडे, मिताली कवडे, निखिल अंकुशे, अनुप कुरनूरकर, डोंगरेश चाबुकस्वार, राहुल यळसंगी, करण कलबुर्गी, अमोल गुंड, ओंकार हगलगुंडे, सुभाष कुरले, मुन्ना पटेल, ओंकार अतनूरे आदी परिश्रम घेत आहेत.