कविता विषय - दिवाळी
(अष्टक्षरी काव्य)
आली आली तेजोमय
अशी सुंदर दिवाळी
घरी आमच्या आंनदी
सुख लाभती निराळी .... १
सजे आंगण आपले
दिवे ज्योत प्रकाशाने
दारी काढती रांगोळी
येती लक्ष्मी पाऊलाने ... २
आई बनवे फराळ
खाऊ एकत्र सगळे
भाऊबीज सणाला
नित्य बहीण ओवाळे ... ३
सण नवीन वर्षाचा
हिंदू धर्माचा असतो
असे सदनी धमाल
मनी उत्सव सजतो ... ४
प्रमोद न सूर्यवंशी
मालाड मुंबई