सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय सोलापूर जिल्हा परिषद व , पुणे अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदर स्पर्धेत या खेळाडूंनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्य पदके प्राप्त केली
श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे विद्यार्थी चि. यज्ञेश्वर पाटील याने सुवर्ण तर कु. नारायणी बासुतकर हिने कांस्यपदक प्राप्त केले
या खेळाडूंची संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सुयशाबद्दल श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन धर्मराज काडादी तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य डॉ. राजशेखर येळीकर,श्री भीमाशंकर पटणे, गुरुराज माळगे, मल्लिकार्जुन कळके व समन्वयक संतोष पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश राऊत पर्यवेक्षक शिवराज बिराजदार बनसोडे व सांस्कृतिक विभाग प्रमुख अंजली खानापुरे तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंना क्रीडाशिक्षक पवन भोसले यांनी मार्गदर्शन केले.