पंढरपूर प्रतिनिधी
नुकत्याच उस्मानाबाद येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या संघ खेळाडू निवड चाचणीमध्ये रोहन भुसणर यांच्या उत्कृष्ट कामगिरीने त्याची चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र नुकतेच त्याला देण्यात आले .उस्मानाबाद येथे महाराष्ट्रातून जवळपास शंभरहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते.
यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून निवडलेल्या खेळाडूंमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातून काही खेळाडूंची निवड करण्यात आली होती .त्यामधून रोहन भुसणर याची 25 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे .सोलापूर जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कापसे यांनी रोहन भुसणर आभीनंदन केले.
या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे, सहशिक्षक राजेंद्र भोसले, दीपक देशमुख, संतोष पवार, नियाज मुलाणी, सोमनाथ भुईटे, वर्षा मोरे,शितल मस्के,सिमा रकटे, शितल बागल,अजय मोरे आदीनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.