पुणे प्रतिनिधी सुभाष मुळे
जॉय ऑफ गिविंग मुंबई या सामाजिक संस्थेला नुकतेच दिनांक ५ नोव्हेंबर रोजी दादर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातील सुरेंद्र गावस्कर सभागृहात प्रमुख पाहुणे दै प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक राम नेमाडे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा सर्वोत्कृष्ट आदर्श सामाजिक संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.भगवे वादळ साप्ताहिक यांचे संपादक दत्ता खंदारे यांनी द्वितीय वर्धापदिनानिमित्त आयोजित केलेल्या एका भरगच्च कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील समाजाप्रती कर्तव्यदक्ष व्यक्ती आणि संस्था यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.जॉय संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्थेने आतापर्यंत तळागाळातील हजारो विद्यार्थी ते वयोवृध्द, वंचित कुटुंब यांना मदत केलेली असून आजही संस्थेचे हे काम अविरतपणे सुरूच आहे.यापूर्वीही अनेकवेळा संस्थेला विविध पुरस्कार मिळाले असून संस्थेचे सभासद आणि समाजातील दानशूर व्यक्ती नेहमीच आमच्या उपक्रमांना सहकार्य करीत असतात व यामुळे सर्वांनाच सामाजिक कार्यात हातभार लावण्याची संधी मिळते, त्यामुळे हे सहकार्य करतात त्यांना आनंद व समाधान प्राप्त होते. आज जॉय ला मिळालेला पुरस्कार हा सर्व सभासद व देणगीदार यांचा असल्याचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी सांगितले.पुरस्कार स्वीकारण्यासाठी चंद्रशेखर सावंत,असुंता डिसोजा, योगिता हिरवे, मीना भुतकर, भूषण मुळये, प्रियांस हिरवे आदी जॉय कार्यकर्ते उपस्थित होते.