सोलापूर प्रतिनिधी
यात हकीकत अशी दिनांक 22/08/ 2023 रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी शकील चांद किस्तके यांच्याविरुद्ध कलम 354, 354 ड, 341, 506 भा.द.वी. आणि 66 इफॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट व 3(1)(w)(i)(ii),3(1)(y),3(2)(va) अनुसूचित जाती जमाती आत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील फिर्यादी व आरोपी एकाच गावातील राहणारे असून फिर्यादी ही महाराजा जिमखाना मध्ये व्यायामा करता जात होती, त्या जिम मध्ये आरोपी प्रशिक्षक म्हणून काम करत होता. तरी डिसेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 कालावधीत आरोपी वेळोवेळी फिर्यादीचा पाठलाग करून तसेच तिला अडवून त्रास देत असे. आरोपी फिर्यादीला न भेटल्यास तिचे फोटोज फेसबुक वर व्हायरल करण्याची धमकी देत होता.
यातील आरोपीने स्वतःच्या फेसबुक अकाउंट वर फिर्यादीचे फोटो वायरल केले होते व तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले होते. वरील प्रकरणात फिर्यादी कडून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आरोपींने जामीनासाठी सोलापूर विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती .
सदर प्रकरणातील ॲड कदीर औटी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे अॅड कदीर औटी, अॅड दत्तात्रय कापूरे , ॲड सोहेल रामपुरे, ॲड. फैयाज शेख व मजहर पटवेगार यांनी काम पाहिले .