वर्धा प्रतिनिधी
वर्धा शहरापासून ३ की. मी. अंतरावर असलेल्या " तानेलवार सभागृहात " विदर्भ बेलदार समाज संघटना जिल्हा वर्धा च्या वतीने बेलदार समाज बांधवांचा वार्षिक कोजागिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून माधुरीताई मु. मेंढेवार ,अध्यक्ष म्हणून अरूणाताई अ. कोटेवार व प्रविणभाऊ एलचटवार,प्रमुख उपस्थिती म्हणून सोनालीताई कोपुलवार आणि विषेश आकर्षण म्हणून प्रसिद्ध जादूगार सलीम शेख विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. मा. सां. कन्नमवार व शिवशक्ती (भुलाबाई) यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माधुरीताई मु. मेंढेवार यांनी कोजागिरी ऊत्सवाचे महत्त्व सांगुन समाज बांधवांना संघटित राहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी जादुगार सलीम शेख यांनी जादूच्या प्रयोगातून आबाल-वृध्दांचे मनोरंजन केले. त्यांच्या या कलेचे कौतुक म्हणून त्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नृत्य आणि प्रश्न मंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात लहान मुलांनी आपल्या बुद्धिमत्तेची अलौकिक प्रतिभा दाखवून चाॅकलेट व बक्षीस प्राप्त केले.
महिला मंडळींनी भुलाबाईची गाणी म्हणत कार्यक्रमाची सांगता स्वरूचि भोजन व दुधाचा प्रसाद घेऊन झाली. सदर कार्यक्रमास २२० समाज बांधवांनी उदंड प्रतिसाद देत कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रीता मो. नागेलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन समस्त कार्यकारिणीच्या वतीने व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पुरूष व महिला कार्यकारिणीतील सर्व सभासदांनी मदत केली.