सोलापूर प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषदेचे पहिले अधिवेशनाबाबत रविवार दिनांक 5/11/2023 रोजी दुपारी 12:30 वाजता श्री.संगमेश्वर महाविद्यालयात विचार सभा आयोजित करण्यात आलेली होती.सदर सभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय इतिहास प्राध्यापक व प्राध्यापिका बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सदस्य तथा श्री.बृहन्मठ होटगी संस्थेचे प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी, उपस्थित होते.या प्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रा. संजय जाधव सर , उपाध्यक्ष.प्रा. गंगाधर घोंगडे सर, पुणे विभागीय सदस्य प्रा.श्रीधर सगेल सर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर बैठकीत महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेचे 1 (पहिले )राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूर ज़िल्ह्यातील श्री. बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्थेचे एमआयडीसी अक्कलकोट रोड येथील श्री.वीरतपस्वी (S.V.C.S) शिक्षण संकुलात वार शनिवार व रविवार रोजी दिनांक 30 व 31 डिसेंबर 2023 या दोन दिवसीय अधिवेशन संपन्न होणार आहे. त्यासाठी विचारपूर्वक चर्चा, नियोजन,सहविचार व सभेतील विविध विषयावर सर्व प्राध्यापकांनी आपापली मते मांडली.त्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रा. संजय जाधव सर यांनी दोन दिवसीय अधिवेशनाच सभासद नोंदणी पासून समारोप पर्यंतचे कार्यक्रम व सत्राचे नियोजनबद्ध रूपरेषा स्पष्ट करून सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना प्रा स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी, मार्गदर्शक मंडळीच्या सल्ल्याने, विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली,व जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या सहकार्याने, हुतात्म्यांच्या,संत सत्पुषांच्या पावन नगरीत,ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्यिक, आध्यात्मिक, सामाजिक,आर्थिक, औद्योगिक,कृषी, पर्यटन इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय असलेलं आपल्या सोलापूर नगराला हा बहुमान मिळाला ही गोष्ट सोलापूर जिल्हा वाशियांसाठी अत्यंत ऐतिहासिक व अभिमानास्पद आहे. सोलापूर जिल्हा वासियांच्या सहकार्याने हे अधिवेशन सर्वांनी मिळूनच यशस्वी करूयात अशा प्रकारचे विनंती आव्हान केले.
सदर सहविचार सभेमध्ये जिल्हा व तालुक्याचे पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आले.या समयी प्रा. श्रीधर सगेल प्रा. गुरुपाद गोरनाळे,प्रा. शंकर कोमुलवार,प्रा. श्रीशैल वाघमोडे,प्रा काशीराया हवीनाळे, प्रा.मुद्दणगौडा चौगुले,प्रा.मीनाक्षी मेडपल्ली,प्रा पुष्पा विभुते,प्रा.रेणुकादेवी अक्कलकोटे,आदि प्राध्यापकांचे बहुमोल सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्रा.मीनाक्षी मेडपल्ली वआभार प्राध्यापक श्रीधर सगेल यांनी केले.