पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
वाखरी येथील कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांमध्ये प्रशांत परिचारक यांनी उसाचा पहिला हप्ता 2800 इतका जाहीर केला असून 16 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत उशिराने येणाऱ्या उसास आगाऊ 50 रुपये प्रति मॅट्रिक टन धरून 2850 इतका पहिला हप्ता देण्यात येणार आहे.
तसेच एक फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी पर्यंत उशिराने गाळप होणाऱ्या उसात शंभर रुपये प्रति मॅट्रिक टन आगाऊ धरून 2900 रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे.
तसेच 01 मार्चपासून पुढे उशिराने येणाऱ्या उसास 150 रुपये ज्यादा धरून 2950 इतका पहिला हप्ता देण्यात येणार आहे.
यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला व चेअरमन ,संचालक व आधिकरी यांचे आभार मानले.