मुंबई प्रतिनिधी पूनम पाटगावे
दिवंगत राषट्रपती भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस आणि हा दिवस महाराष्ट्र राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.यानिमित्ताने आज जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक गणेश हिरवे यांनी सकाळ वृत्तपत्राचे मुंबई सर्कुलेशन अधिकारी मनीष ढवण यांचेकडे नवीन ५० पुस्तक भेट दिली.
ही पुस्तकं सकाळ वृत्त समुहातर्फे विविध शाळेतील मुख्याध्यापकांना भेट देण्यात येणार आहेत. यापूर्वीही हिरवे यांनी विविध क्रीडा स्पर्धा, पाहुणे मंडळी, नातेवाईक, नवीन वाचनालये, विविध सण समारंभ उत्सवा दरम्यान मागील २५ वर्षात जवळपास तेरा हजाराहून अधिक पुस्तक मोफत वाटलेली आहेत.एक वेगळाच छंद हिरवे यांनी जोपासल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले असून अनेक जण त्याचे अनुकरण करीत त्यांच्या परीने पुस्तक वाटत आहेत.वाचन व लेखन करणे हे खूप चांगले छंद असून सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनेकांचे वाचन कमी झाले आहे.
तेव्हा निदान दिवसातून किमान एक दोन पानं आणि दैनंदिन वर्तमान पत्र वाचायलाच हवी असे हिरवे आवर्जून सांगतात.