सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर येथील श्रविका प्रशालेसमोर 13 मे रोजी चारचाकी गाडी पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या खुनी हल्ल्यातील आरोपी रोहन चौगुले यास मा. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मा.शिवकुमार दिघे यांनी अंतरिम जामीन मंजूर केला.
जोडभवी पेठ पोलीस ठाण्यात रवी सुभाष काकडे यांनी रोहन चौगुले यांनी गाडी पार्क करण्याच्या कारणावरून सौदागर शिरसागर व इतर पाच जणांवर खुनी हल्ला केला प्रकरणी रीतसर फिर्याद दिली होती.आरोपी रोहन चौगुले यांनी सोलापूर येथील मा. न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता परंतु मा. सोलापूर जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळला होता.आरोपी तर्फे ॲड. कदिर औटी ॲड.सोमनिंग पुजारी ॲड.रुई धानावाला,ॲड.दत्तात्रेय कापुरे यांनी काम पाहिले.