पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे श्री केशव घोडके, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग (पालखी मार्ग) फलटण - मोहोळ यांना "उत्तम अभियंता" पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करताना प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये कोषाध्यक्ष इंद्रजीत फडे आदि उपस्थित होते.
यावेळी सध्या चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग कामाबाबत, नव्याने वाखरी ते पंढरपूर शहर - भोसले चौक सुरू होणाऱ्या उड्डाण पुलाबाबत माहिती घेण्यात आली.
तसेच पेनूर येथे नवीन सुरू होणाऱ्या टोल नाक्यावरील आकारणीबद्दल व रोड संदर्भातील इतर विषयावरही चर्चा करण्यात आली.