पंढरपूर प्रतिनिधी
शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगावचा रयान तांबोळी राज्यात प्रथम आला आहे .मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये शिवरत्नच्या रयान तांबोळीने गोल्ड मेडल मिळून राज्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे . डिसेंबरमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.या स्पर्धा देशपातळीवरील खेळाडूंमध्ये होणार आहेत .
या स्पर्धेतील यशाबद्दल पालक प्रतिनिधी बिपिनचंद्र ढेरे ,धर्मराज खेडेकर ,उपसरपंच संभाजी पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे सर, उद्योगपती बापूराव निकम यांनी अभिनंदन केले मार्गदर्शक कोच म्हणून आबा गावडे यांनी त्याला मार्गदर्शन केले अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये त्याने यश संपादन केले गेल्या वर्षी पण हा राज्यांमध्ये प्रथम क्रमांक घेऊन विजय झाला होता . शिवरत्नाने आतापर्यंत विविध खेळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे नाव केलेले दिसून येते. जिल्हास्तरीय ,राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा असो डॉजबॉल स्पर्धा असो किंवा इतर कोणताही खेळ आसो. त्यामध्ये शिवरत्नचे विद्यार्थी नेहमीच चमकताना दिसतात.
गादेगाव सारख्या ग्रामीण भागातून इतके चांगले खेळाडू तयार होऊ शकतात हे एक शिवरत्न चांगले उदाहरण तालुक्यासाठी होईल. विद्यार्थ्यांना शिक्षक नेहमीच मार्गदर्शन करत असतात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु विद्यार्थ्यांनीही आपले कौशल्य दाखवल्याशिवाय यश यश संपादक होत नाही संपादन होत नाही हेही तितकेच खरे आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे सहशिक्षक राजेंद्र भोसले, संतोष पवार, दीपक देशमुख, नियाज मुलानी , नागेश कांबळे,सोमनाथ भूईटे,वर्षा मोरे, शितल बागल, मोनाली गायकवाड, मसरूद्दीन पटेल, सिमा रकटे, शितल मस्के, अजय मोरे आदींनी त्याचे आभीनंदन केले.