पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब सर्वं सन्मानीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाची सांगता पंढरपूर येथील स्थानिक कलाकारांच्या भरतनाट्यम नटराज नृत्य क्लासेस व सुशील कुलकर्णी निर्मित मैफिल सप्तसुरांची या कलाविष्काराने संपन्न झाली.
प्रथम सत्रात नटराज नृत्य क्लासेसच्या संचालिका सौ लक्ष्मी बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ नवदुर्गांनी वसुदैवकम कुटुंबकम् ही भरतनाट्यम मधून सादर करत सर्व कलारसिकांना मंत्रमुग्ध केले.सुरुवातीला डॉ वर्षा काणे, डॉ.प्रसाद कुलकर्णी श्रीकांत महाजन,नारायण बडवे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.द्वितीय सत्रात सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम श्रीकांत कुलकर्णी सुशील कुलकर्णी आप्पासाहेब चुंबळकर,योगिता ताटे,सर्व मान्यवर कलाकार यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीला नांदीने सुरुवात झालेल्या कार्यक्रमात अनेक भावगीत भक्तिगीते त्यामध्ये बाई मी विकत घेतला श्याम,जय शारदे वागेश्वरी,झनझनती तारा,देवदेव्हाऱ्यात नाही, दाटून कंठ येतो,अशी अनेक सुंदर गाणी म्हणत विठ्ठल विठ्ठल गजर करत जगण्याचा पाया चालण्याचे बळ या सुंदर भैरवीने कार्यक्रमाची सांगता करत पंढरपूर कलारसिकांना मंत्रमुग्ध करत योगिनी ताटे, श्रीकांत कुलकर्णी प्रसाद खिस्ते, आदिती परचंडे,यांनी गायन करत तबला सुशील कुलकर्णी हार्मोनियम व गायन आप्पासाहेब चुंबळकर,सिंथेसाईजर कल्याण कवडी यांनी सुंदर साथसंगत केली.तर सुंदर निवेदन ऋतुजा फुलकर यांनी केले.यावेळी नवरात्र संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी अधिक परिश्रम घेतले मंदिर कर्मचारी वर्गाचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सर यांनी संपूर्ण संगीत महोत्सवात केले.संपूर्ण संगीत महोत्सवाला पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.प्रत्येक कलारसिक मंदिर समितीचे अभिनंदन करत भविष्यकाळात अशाच कार्यक्रमाची मेजवानी द्यावी असे अनेकांनी सांगितले