श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेलमध्ये 'शालेय व्यवस्थापन पदविका' व 'ग्रंथालय व माहितीशास्त्र पदविका' या शिक्षणक्रमाच्या उदघाटन सोहळ्याचे आयोजन
पनवेल प्रतिनिधी
आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन,नवीन पनवेल मध्ये मा.श्री. धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने दि.२२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या शालेय व्यवस्थापन पदविका व ग्रंथालय व माहितीशास्त्र पदविका या शिक्षणक्रमाच्या उदघाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून मा.आ.श्री.निरंजनजी डावखरे,आमदार, कोकण पदवीधर मतदारसंघ, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. सचिनजी मोरे, संयोजक, कोकण पदवीधर प्रकोष्ठ, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य, मा.श्री.धनराजजी विसपुते चेअरमन, आदर्श शैक्षणिक समूह तथा प्रदेश संयोजक, पदवीधर प्रकोष्ठ, भारतीय जनता पार्टी,श्री. बापूसाहेब डी.डी विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या मा.डॉ. सीमा कांबळे व सर्व प्राध्यापक आणि शालेय व्यवस्थापन पदविका व ग्रंथालय व माहितीशास्त्र पदविका शिक्षणक्रमास प्रवेशित २०८ विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र गीत आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन सोहळ्याचे शुभारंभ करण्यात आले. प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी आपल्या सुंदर वक्तृत्व शैलीत कार्यक्रमाचे उद्दीष्ट आपल्या प्रस्ताविकातून स्पष्ट केले आणि पदवीधर व शिक्षक मतदान नाव नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. मा.आ.श्री. निरंजनजी डावखरे यांनी वाचनाचे महत्व सांगून नवीन राष्ट्रीय धोरणानुसार शिक्षकांनी आपले ज्ञान अद्यावत ठेवण्यासंबंधी शिक्षकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. मा. श्री. सचिनजी मोरे यांनी शिक्षकांनी आपले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यन्त पोहचवावे याबद्दल मार्गदर्शन केले. मा.श्री. धनराजजी विसपुते यांनी भारताच्या भावी पिढीचे भवितव्य घडवायचे असेल तर शिक्षकांच्या समस्या सोडवणे आवश्यक आहे, जुनी पेंशन योजना सुरू करावी याबाबतबत आपले विचार व्यक्त केले. तसेचमहाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. सीमा कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दुपार सत्रामध्ये शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रमाचे उद्बोधन प्रा.श्री. विनायक लोहार यांनी केले तसेच ग्रंथालय व महितशास्त्र पदवी शिक्षणक्रमाचे उद्बोधन प्रा.नेहा म्हात्रे यांनी केले. प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी कृतीसंशोधन विषयी उद्बोधन केले. या नंतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले व संपर्क सत्राची सांगता झाली.