सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्या लयामध्ये अंतर्गत हॅकॅथॉन स्पर्धेचे कल्पना सादरीकरण झाले. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा उपक्रम दैनंदीन जीवनातील काही महत्वाच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि अशाप्रकारे उत्पादनातील नाविन्यपूर्ण संस्कृती आणि समस्या सोडवण्यासाची मानसिकता विकसित करणारा उपक्रम आहे. संगणक विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय गंधमल यांनी विद्यार्थ्यांना स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनबद्दलची संकल्पना सांगितली.
स्पर्धेत एकूण ४२ संघांनी सहभाग घेतला व प्रत्येक संघात ६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण २५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे परीक्षण श्री.नागेश पाथरूट व प्रा. अमोल क्षीरसागर यांनी केले.
यावेळी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. दत्तात्रय गंधमल यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले व हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा. सुनील शाखापुरे यांनी परिश्रम घेतले. या महविद्यालया अंतर्गत सादर केलेल्या कल्पनातून निवडलेल्या संघाला अंतराष्ट्रीय पातळीवर स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळते.