अकलूज प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे लोकप्रिय सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ व कलावंत क्रीडा मंडळ यांच्या या मंडळाला सोलापूर जिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकतार भाई कोरबु व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे या दोघांनी तांदुळवाडी गणेश उत्सव मंडळाला भेट दिली. त्यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचे फेर निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
व रामभाऊ कांबळे आर पी आय आठवले गट माळशिरस उपाध्यक्ष व बाळासाहेब लोखंडे यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
त्यावेळी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके व उपाध्यक्ष मच्छिंद्र वाघमोडे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ कांबळे, बाळासाहेब लोखंडे, विलास पाटील दगडू कदम ,सोमनाथ मिले ,भारत पाटील, सुरेश पराडे,धवल शेळके, अनिल पाटील ,शंभूराज माने, यश देवकते, ब्रह्मदेव काटे त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .