नवी मुंबईतील नेरुळ येथील समाजसेवक भालचंद्र माने यांचा अभिनव उपक्रम भजनी मंडळाला चहाची किटली देऊन आपल्यापासून केली मानव सेवेची सुरुवात
नेरुळ प्रतिनिधी सुभाष हांडे देशमुख
कोकणातील गणेशोत्सव म्हणजे प्रत्येक घरातला गणेशाप्रती श्रद्धेचा, आनंदाचा एक आगळावेगळा सोहळा असतो. महाराष्ट्रात सर्वदूर नोकरी व्यवसाय निमित्ताने गेलेले ग्रामस्थ श्री गणेशाच्या प्रेमापोटी मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी गणेशोत्सवामध्ये पोहोचतात आणि गणेशाची प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजाअर्चा करतात. प्रत्येक गावागावात, वाडीमध्ये भजनी मंडळ कार्यरत असतात आणि ते घरोघर जाऊन गणेशाच्या आरत्यां टाळ मृदुंगाच्या साथीने म्हणतात आणि वातावरणातील पावित्र्य जपतात. तो एक आनंदाचा, भक्तीचा सोहळाच ठरतो. तिथे ना आमंत्रणाची गरज असते ना चहापाण्याची अपेक्षा. निरपेक्षपणे प्रसंगी पदरमोड करून आणि उत्साहाने आपली सेवा उपलब्ध करून देतात. खरं तर या भक्तांचे आरत्या म्हणण्यासाठी घरोघर फिरणं होत असल्याने त्यांना चहा नाश्त्याची आवश्यकता असते पण गाव खेड्यात ते त्या कुटुंबातील प्रत्येकाला देणे शक्य होत नाही. भालचंद्र माने यांनी याचा सखोल विचार करून प्रत्येक मंडळाच्या सोबत चहाची मोठी किटली चहा भरुन सोबत असेल तर त्यांना कमीत कमी चहा सहजपणे उपलब्ध होऊ शकेल, हा प्रगल्भ विचार करून त्यांनी चहाच्या किटल्या वाटण्याचा विचार मित्रांकडे मांडला आणि तो सर्वांनी उचलून धरला आणि भालचंद्र माने यांनी आपल्या स्वतःपासून या सेवेची प्रथम सुरुवात केली व ग्रामस्थांमध्ये एक आदर्श निर्माण केला.
संगमेश्वर तालुक्यातील बोरसुत येथील तांबलवाडीत भजन मंडळाला विनय खामकर यांच्या घरी चंद्रकांत खामकर (अप्पा), भजनी बुवा रमण खामकर, भजनी बुवा प्रदीप शिंदे, योगेश अढटराव , विनय खामकर आणि बहुसंख्येने ग्रामस्थ व चाकरमानी यांच्या उपस्थितीत भालचंद्र माने यांनी चहाची किटली भेट दिली. आणि या उपक्रमाचा श्री गणेशा केला. ही चहाची किटली नामवंत कंपनीची असून त्यात दहा तास गरम पेय राहते. गणपती उत्सवात भजन मंडळी घरोघरी भजन करतात. त्यावेळेला चहाचा कार्यक्रमाला घरातील महिला व सदस्यांना कमी त्रास होईल व चहा घेण्यास भक्तमंडळींना सोयीस्करही होईल. तसेच इतर वेळीही वाडीतील कोणत्याही कार्यक्रमाला चहा घेऊन जाण्यास आणि तो देण्यास किटलीचा उपयोग होईल. भालचंद्र माने यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचे कौतुक होत आहे. उपजतच सेवाभावी वृत्ती असलेले भालचंद्र माने नेरुळ येथील यूथकौन्सिल या सेवाभावी संस्थेसोबत कार्यरत असल्यामुळे ही त्यांची सेवावृत्ती अधिक वाढीस लागली. यूथकौन्सिल नेरुळ ही संस्था वर्षभर अशाप्रकारे समाजहितैशी सेवाभावी उपक्रम सातत्याने राबवत असते. त्यातूनच ही एक प्रेरणा आणि ती दृष्टी मला मिळाली असे भालचंद्र माने अभिमानाने सांगतात. भविष्यात सुद्धा असे छोटे मोठे कार्यक्रम गाव आणि वाडीच्या विकासासाठी करण्याचे स्वप्न आहे. गाव खेड्यातील लोकांना गरम गरम चहा या पेयाचे जास्त आकर्षण आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी भजन मंडळ, सार्वजनिक सेवा केंद्र येथे चहा गरम राहील अशी त्यांचे नावं फोटोसह किटलीचे वाटप केले तर त्यांचे नाव होईल आणि तो समाजउपयोगी असा चांगला उपक्रमही ठरेल. गावातील होतकरू युवकांना रोजगारही उपलब्ध होऊ शकेल. त्याचप्रमाणे गरम चहा मिळेल अशी उपलब्धता गावातील लहान मोठे जिथे काम करणाऱ्या कामगारांना किंवा एखाद्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला त्यांचा व्यवसाय होऊ शकतो. उत्तम प्रतीच आलं, चहापत्तीचा मसाला असा गरम चहा त्या त्या भागात प्रसिद्ध झाला तर स्थानिक व्यक्तीला रोजगार मिळेल असेही ते सुचित करतात.
गणेशोत्सवाप्रमाणेच ग्राम पातळीवर वेळोवेळी विविध धार्मिक उत्सव, सण सातत्याने साजरे केले जातात. त्यामुळे भालचंद्र माने यांचा हा उपक्रम नक्कीच अधोरेखित ठरावा.